कोरोनाने मृत सभासदांच्या वारसांना 10 हजारांची मदत

0

कासोदा ता, एरंडोल | प्रतिनिधी

येथील  राजा भाऊ मंत्री पतसंस्थेची वार्षिक सभा ऑनलाइन संपन्न दिनांक 28/03/2021रोजी संस्थेच्या आवारात संस्थेचे चेअरमन मा. श्री पांडुरंग वाणी यांचे अध्यक्षतेखाली मा.जि. उपनिबंधकसो सह. संस्था जळगाव यांचे आदेशाने ऑनलाइन पार पडली असे. अजेंड्यावरील सर्व विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली  संस्थेत सन 2019/20 या आर्थीक वर्षात संस्थेस चढत्याक्रमाने विक्रमी असा नफा रु 3690723/- झाला असुन  सभासदांना 15%प्रोरेटा पद्धतीने लाभांश वाटप सुरू असुन सभासदांना 600/रु मिटींग भत्ता अदा करण्यात आला असुन संस्थेत सतत ऑडीट ‘अ’ मिळाला असे. सभेत मयतांना श्रद्धांजली वाहण्यात आली व कोविड19 ने मृत्यू पावणाऱ्या सभासदांच्या वारसांना 10000/- मदत देणे बाबत व कोविड19 मदत निधी तयार करणेबाबत  आयत्यावेळी येणाऱ्या विषया  त मंजूरी देण्यात आली .प्रत्येक सभासदाचा तीन वर्षांचा 100000/-अपघात विमा उतरविण्यात आला असुन त्यात दोन सभासदांच्या वारसांना लाभ देण्यात आला असे. सभेतील अहवाल वाचन व आभार व्यवस्थापक यांनी केले. सभेत ऑनलाईन कॅनडातून सभासद श्री सुरेश सूर्यवंशी यांनी सहभाग नोंदविला असे  सभा खेळीमेळीच्या व कोविड19 दुःखात पार पडली असे.सभेत प्रत्यक्ष 82 सभासदांनी हजेरी लावली असे.संस्थेत 2020/21 या आर्थिक वर्षात नफा रु 3276192/-  असुन व 15%प्रोरेटा पध्दतीने लाभांश व मिटिंग भत्ता देण्याचा मानस! संस्थेत 31/03/2021अखेर कोविड19 ची महामारी असतांना देखील रू  3276192/   इतका नफा झाला असुन या वर्षी देखील सभासदांना 15% दराने नफा व मिटिंग भत्ता देण्याचा मानस असल्याचे चेअरमन व व्हा. चेअरमन संचालक व व्यवस्थापक यांनी नमुद केले असे व सर्व सभासद ठेवीदार व कर्जदार यांचे मनपूर्वक आभार मानले व संस्थेवर असेच प्रेम राहू दयावे अशी विनंती देखील केली असे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.