जामनेर ग्लोबल हॉस्पिटलला पालकमंत्र्यांची भेट

0

जामनेर | प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील कोविड ची रुग्ण संख्या पाहता पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांची उपजिल्हा रुग्णालय व ग्लोबल हॉस्पिटलला आज संध्याकाळी भेट दिली.जामनेर तालुक्यासह जिल्हाभरात कोविड रुग्णांना भासणाऱ्या ऑक्सिजन व रेमडेसिवीर यांचा तुटवडा अभावी अनेकांना जीव गमवावा लागत असून या अनुषंगाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात व ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भेट दिली.याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत रेमडेसीवीर औषधींचा व ऑक्सिजन चा तुटवडा कमी पडु देणार नाही.कोणी औषधांचा साठेबाजार करत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच ग्रामीण भागातील  रुग्णांनी भीती न ठेवता आपल्याला कोविड लक्षणे जाणवत असल्यास लवकर तपासणी करावी जेणेकरून त्यावर लवकर उपचार केला जाईल. तसेच बाहेर पडतांना आपण मास्क लावणे गरजेचे असून सर्वांनी स्वतःची काळजी घ्या.कोणत्याही औषधांची कमतरता भासल्यास वरिष्ठांना माहिती द्या अन्यथा आम्हाला सांगा असाही सल्ला पालक मंत्र्यांनी दिला.यावेळी तहसीलदार अरुण शेवाळे तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे,  नोडल अधीकारी विनय सोनवणे, डॉ. रईस अन्सारी, डॉ. गायकवाड, डॉ. सिसोदिया, आर. के. पाटील.आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.