कोरोनाची तिसरी लाट आणि घ्यावयाची काळजी

0
महाराष्ट्रासह भारतात  जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता  आरोग्य विभागाने वर्तविली   होती.स्पेन, ब्रिटन आणि युरोपातील इतर देशांमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट आल्यानंतर पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला होत आजही काही देशांमध्ये ताळेबंदी सुरू  असून. लोक कसोशीने कोरोना नियमांचं पालन करत आहेत.भारतात मात्र  कोरोनाच्या नियमांबाबत सरकार सह  नागरिकांनी सावधगिरी न  बाळगल्याने  कोरोनाचा सर्वत्र प्रादुर्भाव झाला,त्याचा परिणाम आपल्या सर्वांना भोगावे लागत आहेकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तीन लाखांच्या वर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असून हजारोंच्या संख्येत रुग्ण मरत आहे.. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असला तरी तिसरी लाट येऊ नये यासाठी काळजी घेणंही तेवढंच आवश्यक आहे. त्याशिवाय तिसरी लाट टाळणं शक्य होणार नाही..भारताला आता गाफील राहून चालणार नाही….कोरोनाची तिसरी लाट  ही अत्यंत मोठी असेल, असं म्हटलं जातं.
देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वजण त्रस्त आहेत. ही लाट ओसरण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. असं असतानाच कोरोनाची तिसरी लाट देखील धडकणार आहे असं तज्ज्ञांचं मत आहे पण ही लाट दुसऱ्या लाटेइतकी घातक नसेल असं देखील ते सांगतात.
साधारणतःसप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात कोव्हिड-19 संसर्गाची तिसरी लाट येईल. ही लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असेल. पण, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत गंभीर नसेल,असे तज्ज्ञांच मत आहे. त्यामुळे वेगवान लसिकरण व कोरोना नियमांचं पालन करण्याची गरज आहे.
भारतात लसीकरण होत असलं तरी लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत धीम्या गतीने होत आहे.गेल्या वर्षभराची प्रतीक्षा, प्रारंभीची अनास्था, नियमांचा अडसर आणि नियोजनातील गोंधळ असा प्रवास करीत देशात करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. ४५ वर्षांपुढील सर्व नागरिकांनाही आता लस मिळेल. पहिल्या दोन टप्प्यांच्या अनुभवातून लसीकरणाच्या काही त्रुटी दूर झाल्याने नवा टप्पा सुरळीत होईल, अशी आशा आहे. संसर्गाची नवी लाट आणि धडकी भरविणारी रुग्णसंख्या पाहता करोनाचे आव्हान कायम आहे. गेल्या अडीच महिन्यांत देशात सुमारे सात कोटी ते आठ कोटी नागरिकांना लस मिळाली असून, त्यात सुमारे ६२ लाख लोकांचे लसीकरण करणारा महाराष्ट्र आघाडीवर आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आणि दोन लसींचे डोस दिले जात असल्याने सध्याच्या लसीकरणाचे प्रमाण चार टक्केही नाही. साधारण साठ ते ७० टक्के नागरिकांना लस मिळाल्यावर ‘सामूहिक प्रतिकारशक्ती’ तयार होईल, हे तज्ज्ञांचे मत प्रमाण मानल्यास १२ कोटींचा महाराष्ट्र आणि १३० कोटींच्या देशात आजच्या गतीने हे लक्ष्य गाठण्यास मोठा कालावधी लागेल. म्हणूनच लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. लसीकरणाचे सर्वाधिकार केंद्र सरकारकडे असल्याने लसपुरवठा आणि प्राधान्य यावरून अनेक राज्ये आणि केंद्रात वाद झडत आहेत.
केंद्राने लसीचं धोरण पूर्णपणे हातात घेतल्यामुळे टीका झाली होती. त्यामुळेच केंद्राने यात बदल केला. पण यामुळे राष्ट्रीय स्तरावर नियोजनात अडथळा येणार आहे.
देशात सध्या दोन लशी उपलब्ध असून जगभरातील अनेक लशींना  भारताचे दरवाजे उघडलेले असले तरी अद्याप त्या भारताला मिळाल्या नाही.कच्च्या माला अभावी लस उपलब्ध होत नसल्याने लसीच्या पुरवठ्याचे आव्हान राहणार आहे.लसीसाठी लागणारा कच्चा माल अमेरिका व युरोपीय देशांकडून आयात करावा लागतो.अमेरिकेने कच्चा माल देण्यास आधी नकार दिल्याने लसीचा तुटवडा निर्माण झाला.आता अमेरिका भारताला कच्चा माल देण्यास राजी झाला आहे.  लस तयार करण्या पर्यत तो जनतेपर्यत पोहोचण्यात अनेक तांत्रिक अडचणी येणार आहेत्या अडचणी दूर करण्याची गरज आहे.
१ मै पासून केंद्र सरकारने देशभरात लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रक्रिया २८ एप्रिल पासून सुरू झाली असून येत्या १ ,मै पासून १८ वर्षावरील सर्व तरुणांना लस दिली जाणार आहे।त्याची नोंदणी
कोविन अॅप’ किंवा ‘पोर्टल’ वर करायची आहे मात्र पहिल्याच दिवशी बाबत अनेक तक्रारी समोर आल्याआहेत. अशा वेळी तांत्रिक अवडंबर न करता फक्त आधार कार्डांद्वारे ऑफलाइन नोंदणी करून युद्धपातळीवर लसीकरण आवश्यक आहे.यासाठी तसे प्रयत्न आधीच करण्याची गरज आहे.
 याशिवाय तिसरी लाट रोखताना नागरिकांनाही आपलं कर्तव्य पार पाडावं लागणार आहे. लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत अनावश्यक घराबाहेर पडणं, मास्क वापरणं हे पाळावं लागेल. काही गोष्टींसाठी सरकारला जबाबदार धरताही येईल, पण त्याचे परिणाम मात्र आपल्या स्वतःला भोगावे लागतात. त्यामुळे नागरिक म्हणून कर्तव्यांचं पालन गरजेचं आहे.लसीकरणानंतर तब्बल दोन महिन्यांनी प्रतिकारशक्ती वाढणार असल्याने नागरिकांनीही लस घेतल्यानंतरही सर्वतोपरी काळजी घेणे गरजेचे आहे.
प्रा.सुधीर अग्रवाल
मो.९५६१५९४३०६

 

Leave A Reply

Your email address will not be published.