राज्यात 7 मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचा अंदाज

0

पुणे: राज्यात गेल्या दोन दिवसापासून विविध ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावलीय, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर. या जिल्ह्यात पावसाचा शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा बसलाय, मात्र अजूनही 7 मे पर्यंत हवामान विभागानं वादळी वाऱ्यासह जोरदार पूर्व मोसमी पावसाचा इशारा दिला आहे. पावसामुळे ऐन उन्हाळ्यात आता तापमान मोठ्या प्रमाणावर घटलंय.

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात निर्माण झाल्यानं मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात गारपीटीसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. गेल्या 24 तासात बुलडाणा इथं सर्वाधिक 30 मी.मी पावसाची नोंद करण्यात आलीये तर पुण्यातही 27 मीमी पावसाची नोंद करण्यात आली

राज्यात कोकण, गोवा , मध्य महाराष्ट्र, व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शेतकऱ्यांना पावसाच्या दृष्टीने गोळा केलेल्या पिकांवर आच्छादन टाकणं गरजेचं आहे.

राज्यात 7 मेपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यासह पुणे घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलीय, मात्र, या काळात वीज कोसळण्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्याची तीव्रता जास्त असल्यानं जीव जाण्याचं प्रमाण आहे, त्यामुळे ढगाळ वातावरणानंतर वीजा कडकत असताना मोकळ्या वातावरणात न फिरण्याचं आवाहन पुणे हवामान वेधशाळेनं केलंय.

Leave A Reply

Your email address will not be published.