कॉग्रेसच्या वतीने मास्क, सॅनिटायझरचे वाटप

0

वरणगाव | प्रतिनिधी 

कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी  शासनाने नागरिकाना केलेल्या मार्गदर्शनानुसार  मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याच्या आवाहन केल्याने  भुसावळ येथे कॅग्रेसच्या वतीने नागरिकास वाटप करण्यात आले. शहरातील गवळीवाडा येथे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे या पुढाकाराने जिल्हाध्यक्ष अॅड सदिप भैया पाटील यांच्या सुचनेनुसार व प्रदेश कॉग्रेसचे योगेद्रभैय्या पाटील यांच्या प्रमुख उपस्थीत प्रदेशध्यक्ष आ नाना पटोले यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधत गवळी वाडा परिसरातील नागरिकाना कोरोना या संसर्ग आजारा पासुन दुर ठेवण्यासाठी व सुरक्षीत राहण्या हेतुन सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी रहिम कुरेशी , इस्माईल गवळी , सुनिल जोहरे , सागर कुरेशी , राजा रवान आदी उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.