एरंडोल येथे आदर्श….सत्यशोधक पद्धतीने विवाह संपन्न

0

एरंडोल | प्रतिनिधी 

एरंडोल येथे परिवर्तनाची विचाराची चळवळीला चांगलेच प्रतिसाद मिळत आहे.गेल्या तीन वर्षात सत्यशोधक पद्धतीने ११ वा विवाह सोहळा आज दी ४/६/२१ रोजी एरंडोल येथे चि. मिलिंद व  पूनम यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.एरंडोल येथील सावतामाळी नगर येथील रमेश भिका माळी यांच्या घरी हा विवाह सोहळा करण्यात आला.

सत्यशोधक समाज निर्मिती करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचारा तून चि.मिलिंद याने सत्यशोधक विवाह करण्याचा विचार केला होता.

सत्यशोधक विवाह सोहळ्याचा  विधी पातोंडा येथील भगवान रोकडे यांनी केला व सत्यशोधक विवाह का केले पाहिजेत सत्यधर्म म्हणजे काय याचे मार्गदर्शन धुळे येथील राजकिशोर तायडे यांनी समाज प्रबोधन केले. हळदीचा कार्यक्रम एरंडोल येथील सत्यशोधक विचारानं प्रेरित झालेले शिवदास माळी ,दिनेश महाजन ,कविराज पाटील यांनी नियोजित केला.समाजात परिवर्तन होणे गरजेचे आहे.सर्व समाजकार्यासाठी बहुजनांचे महामानव यांनी आपले देह झिझवले आहेत त्याची जाणीव आता झालीच पाहिजे असे प्रतिपादन वर मिलिंद यांनी या वेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.