कुल्फी आणि चॉकलेटसाठीचं तर चंद्रकांतदादा भाजपमध्ये’; खडसेंचा जबरी पलटवार

0

मुंबई । एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला. यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. खडसेंना आता कॅडबरी मिळते की लिमलेटची गोळी? तेच पाहायचं आहे, या पाटील यांच्या टीकेचा खडसेंनी खरपूस समाचार घेतला आहे. ”चंद्रकांतदादा, तुमचा भाजपशी संबंध काय? तुमचं योगदान काय? तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून भाजपमध्ये आलात,” असं सांगत खडसेंनी जबरदस्त पलटवार केला.

 

”भाजपनं मला काहीही फुकट दिलेलं नाही. त्यासाठी मी माझं 40 वर्षाचं आयुष्य भाजपला दिलं आहे. मला फुकट मिळालं नाही. मनगटाच्या जोरावर मिळवलं आहे. चंद्रकांतदादांचा भाजपशी संबंध तरी काय होता? तुम्ही विद्यार्थी परिषदेत होता. काही तरी कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून तुम्ही भाजपमध्ये आला. तुम्हाला सर्व फुकट मिळालं, अशी टीका करतानाच कोल्हापुरात आमदार, खासदार तर सोडा साधा पंचायत समितीचा सदस्य तरी तुम्हाला निवडून आणता येतो का?” असा सवालही खडसेंनी केला.

 

”भाजपमध्ये माझा छळ झाला. माझी बदनामी झाली. म्हणून मी पक्ष सोडला. काही मिळविण्यासाठी पक्ष सोडला नाही, असंही त्यांनी सांगितलं. माझा भूखंडाशी काहीही संबंध नसताना माझी चौकशी करण्यात आली. आता माझ्याकडे काही लोकांच्या भूखंड गैरव्यवहाराचे कागदपत्रं आहेत. त्याच्या चौकशीची मागणी करणार. गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणात पुराव्याशिवाय मी कोणतेही आरोप केले नाहीत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.