कुली असोसिएशन तर्फे रेल्वे अधिका-यांना निवेदन

0

गँगमन व ट्रॅकमॅन च्या नोकरीत समाविष्ट करण्याची मागणी

भुसावळ –
कुली यांना गँगमन व ट्रॅकमॅन च्या नोकरीत समावेश करून त्यांच्यावरील उपासमारी टाळावी अशी मागणी करीत येथील समस्त कुली असोसिएशनतर्फे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांच्या नेतृत्वाखाली कुली बांधवांनी केली आहे . याबाबत आज दिनांक 18 मार्च रोजी रेल्वे स्थानक प्रबंधक कार्यालय प्लेटफार्म क्रमांक 3 येथे रेल्वे स्टेशन प्रबंधक ए ए अय्यर यांना निवेदन देण्यात आले आहे
देशभरातील रेल्वे विभागामध्ये हायटेक होणा-या रेल्वे स्थानकात भुसावळ रेल्वे स्थानकाचाही समावेश आहे . याच हायटेक च्या भरवश्यावर अनेक कुली बांधवांचे काम कमी झाले आहे . काम नसल्याने कुली बांधवांवर भूकबळीची वेळ आली आहे .काही वेळेस तर संपूर्ण दिवसभर एकही पॅसेंजर मिळत नाही 100 रुपये बोहनी सुद्धा होत नाही यामुळे आम्ही आमच्या कुटुंबियांचे व स्वतः चे पालनपोषण करू शकत नाही .या भूकबळी पासून वाचण्याकरिता अन्नाची गरज आहे व याकरिता काम हवे म्हणून आम्ही रेल्वे प्रशासन व सरकारला विविध माध्यमातून वारंवार सूचित केले मात्र त्यांनी आम्हाला पीटीओ , पास यासारख्या शुल्लक सुविधा देऊन आमची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला . त्यांच्याकडून कुली बांधवांकरिता कोणतीही ठोस निर्णय नाही . याकरिता आमची मुख्य मागणी आहे की 2008 मध्ये ज्या पद्धतीने माजी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी सर्व कुली यांना रेल्वे मध्ये गँगमन व ट्रॅकमॅन मध्ये नोकरी दिली होती त्याप्रमाणे आताही देण्यात यावी जेणे करून भूकबळी पासून कुली बांधवाना वाचवू शकतो अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे .
यावेळी युनिअन मंडळ अध्यक्ष अनिल सावळे , राजू पाटील, मोहसीन पटेल , शेख कयाम , रफिक खान , जितू जाधव , शेख फकिरा , शेख सलीम , पिंटू धोबी ,यांचेसह कुली बांधव उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.