चला करूया व्यसनांची होळी

0

चेतना व्यसनमुक्ती व रोटरी क्लब यांचा उपक्रम

जळगाव दि.18 :-
चेतना व्यसनमुक्ती उपचार केंद्र व रोटरी क्लब ऑफ जळगाव यांच्या संयुक्तविद्यमाने…चला करूया व्यसनांची होळी… या आगळ्या वेगळ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा उपक्रम बुधवार 20 रोजी सायंकाळी 5.30 वा जी.एस.ग्राऊंडवर साजरा होणार आहे.
उत्सवाचे प्रमुखपाहुणे म्हणून कोगटा इंटरनॅशनलचे अध्यक्ष प्रेम कोगटा, डॉ. विलास भोळे, डॉ. राजेंद्र भालोदे, डॉ. गंभीरराव, डॉ. किरण भारूड, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त योगेश पाटील, पोलिस निरीक्षक विलास सोनवणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, उदय पोतदार, विजय वानखेडे, डॉ. मयुर मुठे, प्रविण पाटील, डॉ. जयंत जहागिरदार, डॉ. सतिश शिंदाडकर, डॉ.ए.एम. चौधरी, मुस्ताक सालार उपस्थित राहणार आहेत.
समाजाच्या आजच्या प्रमुख समस्यांपैकी एक समस्या म्हणजे व्यसनं होय. सर्व प्रकारच्या व्यसनांनी आज आपल्या समाजाकडे धुमाकुळ घातलेला आहे. व्यसनांमुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक,आर्थिक व सामाजिक हानी होत असते एकट्या व्यसनी व्यक्तीवर त्याचा परिणाम होत नसतो तर संपूर्ण परिवारावर होत असतो. त्यामुळे अनेक कुटूंबे उद्ध्वस्त होतांना आपण बघतो दैनंदिन जीवनामध्ये व्यसनांमुळे घडणारे वाद, गुन्हे, घात,अपघात हिंसाचार, भांडणेही,आपण रोजच बघतो. हे कुठेतरी थांबले पाहिजे युवापिढी व्यसनांपासून दूर राहिली पाहिजे.आपलं शहर व्यसनमुक्त झालं पाहिजे म्हणून या आगळ्या-वेगळ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.