किशोर कुंझरकर यांच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

0

जळगाव प्रतिनिधी । एरंडोल येथील पळासदळ शिवारात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. उपक्रमशील शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांच्या मृत्यूचे रहस्य अखेर उलगडले असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
१० डिसेंबर रोजी पहाटे किशोर पाटील कुंझरकर यांचा मृतदेह मारहाण केलेल्या स्थितीत पळासदळ (ता. एरंडोल) येथील शिवारात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. कुंझरकर हे घरातून पहाटे तीन वाजता निघाले होते. यानंतर थेट त्यांचा मृतदेहच आढळून आला होता. या अनुषंगाने एलसीबीच्या पथकाने तपास सुरू केला होता. या तपासात सीसीटिव्हीचे फुटेज जमा करण्यात आले होते. यातील एका फुटेजमधून पोलिसांना मोठा पुरावा मिळाला.
या अनुषंगाने पोलिसांनी वाल्मीक रामकृष्ण पाटिल-देवरे (वय-३२ ), आबा भारत पाटिल -पवार (वय-२५) दोन्ही राहणार सोनबर्डी, ता. एरंडोल अशा दोघांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. किशोर पाटिल-कुंझरकर यांनी मृत्यूच्या दिवशी पहाटे तीन वाजता शेकोटीवर या दोघांसोबत गप्पा केल्या. यानंतर या दोघांनी कुंझरकरांना मारहाण करण्यास सुरवात केली. ही घटना अनेकांनी पाहिली असली तरी कुणी समोर येत नव्हते. यातील सीसीटिव्हीच्या एका फुटेजमध्ये मारहाणीची घटना दिसून आली. यातूनच हा गुन्हा उघडकीस आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.