श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान भडगाव तालुका कार्यालयाचे उद्या उद्घाटन

0

भडगाव | प्रतिनिधी

अयोध्यातील श्रीराम मंदिर निर्मानाला प्रारंभ झाला आहे. सर्व भारतीयांच्या सहभागाने भव्य श्रीराम मंदिर साकारणार आहे. यासाठी देशव्यापी निधी संकलन अभियान सुरू होणार असून भडगाव तालुका कार्यालयाचे उद्घाटन सोमवार दि.21 रोजी सायंकाळी पाच वाजता प. पू. श्री. खामनीकरजी महाराज ( श्री क्षेत्र कानाशी) , प. पू. श्री. चंद्रदासजी महाराज ( श्रीराम मंदिर कोठली आश्रम) यांच्या शुभहस्ते नवीन कोर्ट समोर होणार आहे. यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम मंदिर निधी संकलन समिती भडगाव यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.