काशिबाई कोल्हे शाळेजवळून अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील काशिबाई कोल्हे शाळेजवळून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मेस्कोमाता नगरात १७ वर्षीय मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. दुकानात जावून येते असे सांगून १२ जुलै रोजी मुलगी घराबाहेर पडली. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी आली नाही. नातेवाईक आणि मैत्रीणींकडे शोधाशोध केली असता मिळून आली नाही.

प्रेमकुमार नारायण सावळे (वय २०, रा. नायगाव ता. यावल जि. जळगाव) या तरूणाने फुस लावून पळवून नेल्याचे लक्षात आले.  पाच दिवसानंतर शनिवार १७ जुल रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मुलीच्या आईने शनीपेठ पोलीसात तक्रार दिली. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रेमकुमार सावळे याच्या विरोधात शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.