काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

0

विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्राचार्य अमित सिंह भाटिया समन्वयीका स्वाती आहिराव उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी किनगे यांनी केले या स्पर्धेत इंग्लिश ,हिंदी ,मराठी ,विज्ञान, इतिहास ,गणित , कम्प्युटर. यात या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला या प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी प्रदीप पाटील ,सुनंदा मिश्रा ,भारती अत्तरदे ,सुचिता बोरसे या शिक्षकांनी विविध विषयांवर मुलांना प्रश्न विचारले स्पर्धेत इयत्ता 4 थी हेम पाटील , दिव्युश सुरवाडे, कोमल नेमाडे, सक्षम पटनी इयत्ता  5 वी चे विद्यार्थी अर्णव चौधरी एकता  मुंदडा वैदिका महाजन मनिष बाविस्कर या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला स्पर्धेचे गुण दर्शिका चित्रा पाटील अनिल कोथळकर स्नेहलता रणधीर यांनी केले या स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्णव चौधरी सक्षम पटणी यांनी पटकाविला विजेत्या विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य अमित सिंह भाटिया व स्वाती अहिराव यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाधान पाटील, धिरज जावळे ,अरुण पाटील,मयुरी सुलक्षणे,तेजस्वी बाविस्कर ,सरोज जैस्वाल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले

Leave A Reply

Your email address will not be published.