कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ ; वाहनांकडे भिरकावला दगड

0

जळगाव :  भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आटोपल्यानंतर एका कार्यकर्त्याने भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना शिवीगाळ करून पदाधिकाºयांच्या वाहनांकडे दगड भिरकावल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे़.

 

शुक्रवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. बैठकीला प्रांत संघटक विजय पुराणीक यांच्यासह आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते़.बैठक आटोपल्यानंतर काही पदाधिकारी बाहेर येत असतानाच हा कार्यकर्ता दरवाजातच त्यांच्यासमोर लोळत होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी तो मनोरुग्ण असल्याचे सांगत त्याला बाजूला नेले होते.

 

त्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला व काही वेळानंतर ते परतले. मात्र, या दरम्यान, या कार्यकर्त्याने गिरीश महाजन यांना शिवीगाळ केली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने एका कारवर दगडफेक सुद्धा केली. दगडफेकल्याची माहित एका ऑडिओ क्लिपमधून समोर आली आहे़.

 

मात्र, ही व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता नसून मनोरुग्ण असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आले आहे. या प्रकारानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी भाजपच्या कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.