सलग दुसऱ्या सत्रात सोने-चांदी महागली ; जाणून घ्या दर

0

मुंबई : युरोपात धडकलेली करोनाची दुसरी लाट आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेने सोन्याला तेजी आली आहे. सुरक्षित आणि भरवशाची गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे. परिणामी सलग दुसऱ्या सत्रात सोने आणि चांदी दरात वाढ झाली आहे.

 

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने ४१८ रुपयांनी महागले. सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०२८२ रुपयावर बंद झाला. तत्पूर्वी सोने ५०८७० रुपयांपर्यंत वाढले होते. चांदीमध्ये देखील ७४८ रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६०१७२ रुपयांवर बंद झाला. मोतीलाल ओसवालचे कमॉडिटी तज्ज्ञ नवनीत दमानी यांच्या मते जागतिक बाजारात सोने दर प्रती औंस १८६० ते १८९० डॉलर राहील. भारतीय बाजारपेठेत सोने प्रती १० ग्रॅमसाठी ५०२५० रुपये ते ५०६५० रुपयांच्या दरम्यान राहील.

 

goodreturns.in या वेबसाईटनुसार शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९९०० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५०९०० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९०१० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२४६० रुपये आहे. कोलकात्यात ग्राहकांना २२ कॅरेट सोने खरेदीसाठी ४८९१० रुपये मोजावे लागत आहेत. तर २४ कॅरेटचा भाव ५२५२० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोने प्रती १० ग्रॅमसाठी ४७६०० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५१९०० रुपये आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.