कारगिल विजय दिवसानिमित्ताने प्लास्टिक मुक्त गाव

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज सामाजिक व खेल मंत्रालय विभाग अंतर्गत नेहरू युवा केंद्र मार्फत अमळनेर तालुक्यातील तांदळी या गावांमध्ये कारगिल विजय निमित्ताने स्वच्छता अभियान प्लास्टिक मुक्त गाव या उद्देशाने संपूर्ण गावातून 500 ते 1000 किलो प्लास्टिक कचरा गोळा करून संपूर्ण गाव स्वच्छता करण्यात आली.

यामध्ये गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी आणि कॉलेज महाविद्यालय, शाळेतील विद्यार्थी झाडून स्वच्छतेचे काम करत होते. सौनिकांनी मिळवलेला विजय हा रणांगणावर असतो. त्यातून देशाचे संरक्षण होते हा हेतू लक्षात घेऊन गावात गावात स्वच्छता करून रोग विजय मिळवण्याचे काम करण्याचं आणि येणाऱ्या आपत्ती, रोगांचा नाश करण्यासाठी ही स्वच्छता मोहीम करण्यात आली.

जेणेकरून  गावातील लोक सुरक्षित सक्षम राहू शकता. या उद्देशाने ही स्वच्छता मोहीम करण्यात आली. त्यामुळे लोकांमध्ये देशभक्ती देश सेवा आणि आपण काय काळजी घ्यावी, याची माहिती वैशाली बाविस्कर यांनी लोकांना समजून सांगितलीे. यामध्ये स्वच्छ भारत, सुंदर भारत, सुंदर गाव, स्वच्छ गाव  असे वेगवेगळे घोषणा देऊन स्वच्छता मोहीम करण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.