धक्कादायक.. पैशांसाठी ऊसतोड मजुराच्या मुलाचे अपहरण

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

वरणगाव  साखर कारखान्यासाठी ऊसतोड कामगाराने मुकादमाकडून उचल पैसे घेवून कामावर न जाता व पैसे परत न केल्याने ऊसतोड मजुराच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना दि १४ मंगळवार रोजी घडली असुन याप्रकरणी वरणगाव पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, लोणी ता. रिसोड जि. वाशिम येथील रहिवाशी असलेले किसन नागो पवार हे त्यांच्या परिवारासह ऊसतोडणीचे काम करतात.  ते टोळीसह हल्ली यावल तालुक्यातील वडरी येथे वास्तव्यास असुन ऊस तोडीचे काम करीत आहे.  किसन पवार व त्यांच्या टोळीने मागील वर्षी रघुनाथ चौगुले रा. खुपा गाव ता. माजलगाव जि. बिड व अचित जाधव रा. वडरवाडी ता. परतुर जि. जालना यांच्याकडून मजुरीच्या बदल्यात उचल पैसे घेतले होते.

मात्र जादा मजुरी मिळत असल्याने ऊसतोड मजुर हे दुसरीकडे कामाला गेल्याचे समजल्याने चौगूले व जाधव यांनी मजुरास आमचे एक लाख रुपये परत करा असे मोबाईल वरून सांगितल्यानंतर तुमचे पैसे दोन, तीन महिन्यात परत करतो असे ऊस तोड मजुराने सांगितले. त्यानंतर दि. १४ मंगळवार रोजी वडरी ता.  यावल येथील शेतकरी तेजपाल चौधरी यांच्या शेतातून ऊस तोडून  किसन पवार यांचा मुलगा शिवशंकर किसन पवार हा ट्रकटरने ऊस घेऊन मुक्ताईनगरला साखर कारखान्यावर जात असताना तालुक्यातील बोहर्डी गावा जवळून  ९३७३ २०९ १९६ या मोबाईल नबंर वरून रात्री दहा वाजेच्या सुमारास किसन पवार यांना फोन आला की,   तुमचा मुलगा शिवशंकर यास दोन चार व्यक्तीने मारहाण करून गाडीत बसुन घेऊन गेल्याचे कळविण्यात आले.

तेव्हा पवार व त्याच्या सहकाऱ्यांनी बोहर्डी येथे जाऊन मुलाचा व ट्रक्टरचा शोध घेतला असता फक्त ट्रॅक्टर रोडवर उभे होते. तर मुलगा त्या ठिकाणी नसल्याचे समजल्याने माझ्या मुलास रघुनाथ चौगुले, अशोक चौगुले व त्यांचे दोन तीन जोडीदाराच्या मदतीने अपहरण केल्याची शंका आली.

याबाबत ऊसतोड कामगार किसन पावार यांच्या फिर्यादीनुसार रघुनाथ चौगूले, अशोक चौगूले व त्यांच्या जोडीदारा विरोधात भा द वी कलम ३६५ / ३४ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पो हे कॉ नरसिंग चव्हाण व अतुल बोदडे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.