राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करा; रिपब्लिकन पार्टीची मागणी (व्हिडीओ)

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) जळगाव च्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले की , गेल्या दोन वर्षानंतर काल महानगरपालीकेत ऑफलाईन महासभेचे आयोजन केले असता दलित वस्ती निधी वरून खडाजंगी होऊन उपमहापौर कुलभुषण पाटील व स्विकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात शाब्दीक चकमक व धक्काबुक्की झाली.

थेट लाईव्ह…..👇

यामध्ये कोणत्याही प्रकारचे जळगावच्या विकासाच्या व नागरीकांचे हिताच्या रस्ते, गटारी, आरोग्य, शिक्षण वगैरे बाबत नागरीक हे सुखसोई पासून वंचित असतांना संपूर्ण महाराष्ट्रात व देशात अश्या प्रकारची वादावादी, दांगडो करून जळगाव शहराचे नाव हे मलीन करण्यात भर पाडलेली आहे व तसेच राष्ट्रगीत सुरू असतांना मध्येच दांगडो होऊन त्यात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याचे कळते.

त्यातच राष्ट्रद्रोह केल्यामुळे तरूण मुले-मुली, देश, राष्ट्रावर प्रेम करणाऱ्यांवर याचे वाईट पडसाद पडून राष्ट्रहितावर याचा फार मोठा वाईट परीणाम होऊ शकतो, त्यामुळे वरील घटनेची सीसीटिव्हि फुटेज वरून सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशिर कार्यवाही करावी, या सर्व गोष्टीची निपक्षपणे चौकशी करून राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) चे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांचेतर्फे करण्यात येत आहे.

यावेळी प्रताप बनसोडे महानगर उपाध्यक्ष, मिलिंद सोनवणे महानगर युवक अध्यक्ष,  तुषार भोई महानगर उपाध्यक्ष, अनिल लोंढे महानगराध्यक्ष आदी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.