कत्तलीसाठी जाणार्‍या गाय गोर्‍यांची शेतातील गोठ्यातून केली सुटका

0

पाळधी ता. धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

बकरी ईद असल्यामुळे पाळधी जवळ दोन गाव शिवारात भवानी मंदिरात जवळ असलेल्या शेतात गोवंश जातीचे 18 ते 20 गाय गोरे बाधली आहे.  याची माहिती  पाळधी पोलिसांना  मिळाली होती. या  माहितीच्या आधारे पोलिस कर्मचारी व सपोनि गणेश बुवा यांनी काल  साय 5:00 घटनास्थळी धाव घेतली.  शेतात जाऊन तेथे 18 ते 20 गाय गोरे एका गोठ्यात आढळून आले.  शेतमालकाचे नाव माहीत नाही, परंतु अजिम देशपांडे हा घटना स्थळी आढळून आला त्यामुळे  त्याची चौकशी चालू आहे.

पाळधी ग्रामस्थांच्या मदतीने शेताच्या चिखलातून गाय गोर्‍यांना  काढून रस्त्यालगत आणून  आयशर गाडीत घेऊन साई मंदिर येथील गोशाळेत आणण्यात आले.  3 गोरे जखमी अवस्थेत आढळून आले असता त्यांच्यावर उपचार सुरु आहे या अगोदरही काही दिवसांपूर्वी नीलभ रोहन यांनी अवैध कत्तलखान्यावर मोठी कारवाई केली होती.  परंतु काही दिवसांनी तो पुन्हा सुरू झाल्याची गावात चर्चा आहे . पाळधी गावात कत्तलीसाठी गाय- गोरे येतात कसे ? असा प्रश्न गावकऱ्यांना  आहे,

पाळधी येथे सध्या तणावाचे वातावरण असल्याने राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या मागवण्यात आले आहे.  अवैध कत्तलखाना कायमचा हद्दपार करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. याप्रकरणी  पुढील तपास सपोनि गणेश बुवा हे करीत आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.