कंपनीच्या कार्यालयातून कॉम्प्यूटर, प्रिंटरची चोरी ; दोघांना अटक

0

जळगाव | प्रतिनिधी 

येथील एमआयडीसी परीसरातील एका कंपनीच्या कार्यालयातून कॉम्प्यूटर, प्रिंटर आणि इतर साहित्य लांबविणाऱ्या दोघांना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यातील एक संशयित याच कंपनीत कंत्राटी तत्त्वावर कामाला होता. योजना आखुन आणखी एका साथीदारासोबत त्याने कंपनीतील साहित्य लांबविल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, एमआयडीसी परिसरातील सेक्टर नंबर डी. १०४ व डी. १०५ मधील मोरया ग्लोबल लि.कंपनीच्या कार्यालयातून दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केले. चोरट्यांनी कार्यालयातील एकूण १ लाख १८ हजार किंमतीचे कॉम्पुटर प्रिंटर व इतर साहित्य लंपास केले. याबाबत पुरुषोत्तम बद्रीनाथ पाटील (वय ४७, सदगुरुनगर, अयोध्या नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात २३ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी गुन्हा उघडकीस येवून चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पथक तयार केले.

Leave A Reply

Your email address will not be published.