ओमिक्रोन व्हेरिएन्ट कोरोनाचे नवे संकट

0

भारतात कोरोना महामारीच्या दोन लाटांमुळे जनता त्रस्त झाली. पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडली होती. तथापि दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणा पहिल्या लाटेपेक्षा सज्ज झाली होती. त्यामुळे कोरोनाग्रस्तांना आरोग्याची सेवा मिळाली. तरी सुध्दा ऑक्सीजनचा भयंकर तुटवडा निर्माण होऊन आरोग्य यंत्रणेसमेर आव्हान निर्माण झाले. त्यामुळे ऑक्सीजनअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले. आता दुसरी कोरोनाची लाट ओसरत आहे. ही एक दिलासादायक व समाधानाची बाब म्हणता येईल. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस देण्याच्या दृष्टीने भारतात तसेच महाराष्ट्रात समाधानकारत स्थिती म्हणता येईल. परंतु अद्यापही 100 टक्के लसीकरण झालेले नाही हे सत्य आहे. त्यासाठी ज्यांनी लस घेतली गेली नसेल त्यांनी पहिल्यांदा लस घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्यांनी पहिली लस घेतली आहे त्यांनी दुसरी लस घेणे गरजेचे आहे. या लसीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.

तथापि दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रोन व्हेरियन्ट या विषाणूची लाट झाली असून हा विषाणू कोरोनापेक्षा महाभयंकर असल्याचे सांगण्यात येते. दक्षिण ऑफ्रिकेत या ओमिक्रोन व्हेरियन्ट विषाणूचा फैलाव आपल्या भारतात येणार नाही, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य यंत्रणांना तसेच राज्यांना इशारा दिलेला आहे. परदेशातून येणाऱ्या विमानांवर बंदी  घालण्यासाठी येणार आहे. या नव्या ओमिक्रोन व्हेरियंटवर प्रतिबंध करण्यासाठी अद्याप कुठलेही औषध उपलब्ध नाही असे सांगण्यात येते. हा नवा ओमिक्रेन व्हेरिएन्ट विषाणू रोगप्रतिकारक शक्तीला भेद ककरू शकतो, असेही सांगण्यात येते. त्यामुळे सर्वप्रथम सर्वांनी घ्यावयाची काळजी म्हणजे कारोना प्रतिबंधासाठी ज्या ज्या बाबींची  आपण पूर्तता करीत होतो ते करणे अत्यंत आवश्यक आहे.

उदाहरणार्थ कोरोना प्रतिबंधासाठी  आपण मास्क वापरतो ते वापरणे आवश्यक आहे. आपण आपले हात सॅनीटायझरने अथवा पाण्याने धुणे आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. या सर्व बाबींची  आता आपल्या जीवनाच्या अविभाज्य भाग बनल्या पाहिजे. कारण कोणत्या मार्गाने एखादा विषाणू शिरकाव करेल हे सांगता येत नाही. एखाद्या मध्ये अशा विषाणूचा शिरकाव झाला तर त्या विषाणूचे झपाट्याने फैलाव होऊ शकतो. म्हणून कोरोना प्रतिबंधाच्या  नियमावलीचे पालन करणे हे आता प्रत्येकाचे कर्तव्य नव्हे तर बंधनकारक बनले आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता भारतात कमी आहे असे सांगण्यात येत असले तरी विदेशातील ओमीक्रोन व्हेरियन्टच्या आगमनामुळे भारतीयांना समोरसुध्दा एक भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये आगमन झालेल्या ओमिक्रोन व्हेरियन्टचे वृत्त येताच भारत सरकारतर्फे त्याला रोखण्याच्या दृष्टीने अथवा त्याचे भारतात आगमन होणार नाही यासाठी गंभीर पाऊले उचलली जात आहेत. कारण आता पुन्हा कोरोनाच्या विषाणूचा भारतात फैलाव होणे हे परवडणारे नाही. त्यासाठी भारत सरकारतर्फे नवी नियमावली तातडीने जाहीर करून ती राज्यांनी लागू करण्याच्या सूचना दिलेल्या आहे. सार्वजनिक ठिकाणी ज्यांनी मास्क लावलेले नाहीत त्यांना 500 रूपये दंड ठोठावला जाणार आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांनाच एसटी, रेल्वे आणि खाजगी वहानांमध्ये प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार आहे. ज्यांनी दोन्ही डोस घेतलेले असतील त्यांनाच सिनेमागृहात, क्रिकेट पहाणाऱ्यांसाठी परवानगी दिली जाईल. शॉपिंग करतांना ज्या दुकानांमध्ये ग्राहक मास्क लावल्याशिवाय प्रवेश करेल तेथील दुकानदारांना 10 हजार रूपये दंड ठोठावला जाणार आहे. त्यामुळे दुकानदाराला आपल्या ग्राहकांप्रती सतर्क राहणे गरजेचे आहे. मंदिरांमध्ये, लग्नकार्यास मास्कशिवाय जाणाऱ्यांना दंड ठोठावला जाणार आहे. तसेच सिनेमागृहात क्षमतेच्या 50 टक्केच परवानगी दिली जाणार आहे.

एकंदरीत ओमिक्रेन व्हेरएंटची भिती दखविण्यात येत असली तरी तेवढी भितीदायक स्थिती नाही असेही सांगण्यात येते. तथापि आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी या सर्व बाबींचे पालन करणे आवश्यक आहे. भारतात तिसरी लाट येणार येणार म्हणून त्याला थोपवण्याच्या दृष्टीने शासनातर्फे आधीच तयारी सुरू केलेली आहे. तथापि तिसरी लाट येणार नसली तरी हया नवीन ओमिक्रोन व्हेरियन्टच्या आगमनामुळे आणि त्याच्या भयानकतेमुळे एक प्रकारची  भिती निर्माण झालेली आहे. त्याला रोखण्यासाठी शासन सज्ज झाले असून सर्वेातोपरी प्रयत्न सुरू केलेले असले तर ओमिक्रेन व्हेरियन्टचे संकट घोंगावत आहे एवढे मात्र निश्चित. त्यासाठी जनतेकडून सुध्दा शासनाला सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. अन्यथा पुन्हा एकदा कोरोनाचे आगमन झालेले आपल्याला कदापि परवडणारे नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.