एरंडोल येथे कोरोना संदर्भात उपाययोजनांची ऐसीतैसी, बेजबाबदार वर्तनाची होतेय सरशी

0

एरंडोल (प्रतिनिधी- येथे जवळपास पाच ते सव्वा पाच महिन्यापासून कोरोना चा कहर अधिक वाढत असून रुग्ण संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे कोणावर मात करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरीसुद्धा कोरोना ची भीती अजूनही नागरिकांच्या मनात कायम आहे. मात्र तरीसुद्धा कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये अजूनही अपेक्षित उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात नाही असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे कोरोना ची संख्या वाढत आहे अशी चिंता करून काय उपयोग. नाका तोंडाला मास न लावता अनेक नागरिक रोज शहरात सर्वत्र आढळून येतात. सोशल डिस्टंसिंग पाळण्याबाबत फारच उदासीनता दिसून येते. तसेच किराणा दुकानदार, हॉटेल चालक व इतर विक्रेते आपल्या दुकानांवर सॅनिटायझर ग्राहकांसाठी वापरत नाहीत तसेच ग्राहक दुकानांवर गर्दी करताना दिसून येतात ज्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी अडून येईल त्यांच्यावर नगरपालिकेने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे. दुकानदार व विक्रेते केवळ आपल्या धंद्याचा विचार करून कोरोनाचा त्यांना विसर पडतो की काय असे चित्र निर्माण झाले आहे.

एरंडोल येथे ४ सप्टेंबर २० पर्यंत रुग्ण संख्या ८५५ आहे. युवा उद्योजक कुशल तिवारी एरंडोल न. पा. कर्मचारी वना महाजन यांचा कोरोना काळात झालेला मृत्यू धक्कादायक आहे. या दोघांच्या आकस्मिक निधनामुळे गावांमध्ये हाळ हाळ व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय कोरोना बाबाची भीतीसुद्धा काही प्रमाणात वाढले आहे.

मात्र कोरोना रोखण्यासाठी किंवा कोरोना पासून बचाव करण्याचे काम नगरपालिका प्रशासन महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यांचे नसून नागरिकांनी उस्फूर्तपणे उपाययोजनांचे प्रभावीपणे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. तसेच उपाययोजना पाण्याबाबत बेजबाबदारपणे वर्तन करणाऱ्या युवकांना व नागरिकांना लगाम लावणे आवश्यक आहे अन्यथा कोरोना ची ही बुलेट ट्रेन कोरोना रुग्णांना सोबत घेऊन सुसाट धावणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.