अरे बापरे…जिल्ह्यात आज सर्वाधिक १०६३ रूग्ण आढळले

0

जळगाव (प्रतिनीधी) जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आज उद्रेक झाल्याचे आकड्यांवरुन समोर आले. आज दिवसभरात जिल्ह्यात विक्रमी १०६३ रुग्णांची नोंद झाली. त्यात सर्वाधिक ३६९ रूग्ण हे हॉटस्फॉट ठरलेल्या जळगाव शहरातील असून एकूण संख्या ७ हजाराच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३० हजार ७४९ वर पोहचली आहे.

असे आढळले रुग्ण
जळगाव ग्रामीण ८४, भुसावळ ३१, अमळनेर ९९, चोपडा ६७, पाचोरा ४६, भडगाव ३१, धरणगाव २२, यावल ११, एरंडोल ७१, जामनेर ५०, रावेर १९, पारोळा १७, चाळीसगाव ८१, मुक्ताईनगर २५, बोदवड १९ आणि अन्य जिल्ह्यातील १५.

आज दिवसभरात ५०३ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे होणाऱ्यांची संख्या २१ हजार ८४५ इतकी झाली. वाढत जाणाऱ्या रग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडत आहे. एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना त्या तुलनेत मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने ती दिलासादायक बाब आहे. मागील २४ तासात ०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.