एरंडोल नगरपालिकेतर्फे घंटागाडीवर ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती

0

एरंडोल (प्रतिनिधी) :-येथे कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे अशा परिस्थितीत आपण काय केले पाहिजे या विषयी सामान्य नागरिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने एरंडोल नगरपालिकेतर्फे शहरातील घंटा गाड्यांवर ध्वनिक्षेपक लावून ऑडिओ च्या माध्यमातून कोरोना विषयी जनजागृती करण्यात आली या ऑडिओ मध्ये मास्क, सॅनिटायझर , सामाजिक अंतर हात धुण्याचे महत्त्व व प्रतिकारशक्ती वाढविण्याबाबत कोणत्या आहाराचे सेवन केले पाहिजे याविषयी माहिती देण्यात आली.

लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश सिंग परदेशी यांनी सदर वाहनांना हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचे उद्घाटन केले याप्रसंगी मुख्याधिकारी किरण देशमुख नगरसेवक एडवोकेट नितीन महाजन, संजय ढमाल, विनोद पाटील, नव्या दिशा संस्थेचे विकास अधिकारी वैभव पाटील, राहुल ठाकरे, महेंद्र पाटील, अशोक मोरे, रघुनाथ महाजन, वैभव पाटील, अशिष पर्देशी, भूषण महाजन, आर के पाटील, प्रकाश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.