एरंडोल पोलिसांची हॉटेल चालक कार्यवाही

0

एरंडोल | प्रतिनिधी  
येथील शहराबाहेरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर असलेल्या हॉटेल ‘शेर-ए-पंजाब’ या हॉटेलवर मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे एरंडोल पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल पाटील,निलेश ब्राम्हणकर,जुबेर खाटीक व वाहन चालक रविंद्र सपकाळे यांनी आज अचानक धाड टाकत १,०४०रू. किमतीचा टँगो-पंच नामक १८० मि.ली. मापाच्या एकूण २० बाटल्या जप्त केल्या.तसेच हॉटेलमालक हरपालसिंग गुरूपालसिंग हुंदल (बाला) वय-४५,रा.आनंद नगर, एरंडोल यांचेवर मा.जिल्हाधिकारी सोा.जळगांव यांचे दि.२२/०३/२०२० रोजीच्या आदेशाची अवहेलना करीत हॉटेल सुरूच ठेवुन अवैधरित्या मद्याची चोरटी विक्री करीत उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) सह भा.द.वि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. असुन याप्रकरणी अधिक तपास पो.हे.काँ विकास देशमुख हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.