कोरोनाविरोधातील हे युद्ध आपण जिंकणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई : कोरोनाविरोधातील हे युद्ध आपण जिंकणार आहोत. आपण या संकटावर मात केल्यानंतर आपण विजयाची गुढी उभा करू, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.  हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. लढवय्यांचा महाराष्ट्र आहे. आज गुढी पाडवा आहे, या गुढीपाडव्याला महाराष्ट्र हा संपूर्ण भगवा होऊ जातो. मोठे उत्साहाचे वातावरण असते. पण आपल्याला हा गुढीपाडवा साजरा करायचा आहे, तो पण या कोरोनाच्या संकटावर मात करून. या संकटावर मात करून विजयाची गुढी उभी करून पाडवा साजरा करायचा आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना आपल्या घरातील एसी बंद करण्याचे देखील आवाहन केले.
ठाकरे यांनी सुरुवातीला सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आहे. केवळ या वर्षाच्या नव्हे, तर संपूर्ण आयुष्य, सुखाचे, समाधानाचे निरोगी जावो, अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, आज तुम्हाला निगेटीव्ह सांगायला आलेलो नाही. शुभेच्छा द्यायला आलो आहे. आता या संकटाच्या गांभीर्याबाबत कल्पना आली आहे. या संकटाकडे निगेटीव्ह बघत आलो आहे. या संकटाची तुलना मी सुरवातीलाचा जागतिक युद्धाशी केली आहे. युद्ध हे युद्ध असते. पण शत्रू आपल्याला माहित असतो. पण हा शत्रु दिसणारा नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो. घराच्या बाहेर पडू नका, असं ते म्हणाले.
म्हणाले की,  केंद्र सरकारकडून एसी बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेही आम्ही सुरु केले आहे. वर्ष दोन वर्ष चला हवा येऊ द्या मध्येच आहे. खिडक्या उघड्या ठेवा. बाहेरची खेळती हवा येऊ द्या. मोकळ्या हवेत श्वास घेऊ या.

महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

मुंबई शहर आणि उपनगर – 41

पिंपरी चिंचवड मनपा – 12

पुणे मनपा – 19

नवी मुंबई – 5

कल्याण – 5

नागपूर – 4

यवतमाळ – 4

सांगली – 4

अहमदनगर – 3

ठाणे – 3

सातारा – 2

पनवेल- 1

उल्हासनगर – 1

औरंगाबाद – 1

रत्नागिरी – 1

वसई-विरार – 1

Leave A Reply

Your email address will not be published.