एरंडोल तालुका भाजपातर्फे सेवा व समर्पण अभियानातंर्गत कार्यक्रम संपन्न

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

एरंडोल तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्हाउपाध्यक्ष व्यापारी आघाडी अशोक  चौधरी यांच्या स्वस्त धान्य दु.क्र.८  बुधवार दरवाजा येथे सेवा व समर्पण अभियान अंतर्गत भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त  महिला आघाडीतर्फे गरीब कुटुंबांना धान्य किट वाटप व किसान- सन्मान योजना अंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना सन्मान पत्र देऊन गौरव कार्यक्रम व वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी ॲड. किशोर काळकर महाराष्ट्र राज्य जनजाती क्षेत्र प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियान प्रमुख रमेश परदेशी लोकनियुक्त नगराध्यक्ष, रविंद्र महाजन माजी नगराध्यक्ष, अशोक चौधरी जिल्हाउपाध्यक्ष व्यापारी आघाडी, अमोल जाधव तालुका सरचिटणीस, डॉ. नरेंद्र पाटील, ॲड. नितीन महाजन नगरसेवक, नगरसेविका सौ. जयश्री पाटील, उप जिल्हा अध्यक्ष महिला भा. ज.पा.सौ. आरती परदेशी, शोभा पाटील, मीना चौधरी, तृप्ती बिर्ला, रत्ना ताई देवरे, संध्या महाजन, शोभना साळी, पुष्पा येवले, नयना पाटील, नीता महाजन, अंजुषा विसपुते मॅडम, निशा विंचूरकर, सौ. चौधरीताई, प्रशांत महाजन तालुका युवा मोर्चा अध्यक्ष, अजेंद्र पाटील, वाल्मिक सोनवणे, संजय साळी, सुभाष पाटील, ऋषिकेश पाटील, नरेश ठाकरे, नंदलाल सोनार, धनराज पाटील, लोकेश महाले, प्रदीप पाटील सर्व जिल्हा पदाधिकारी,ता. पदाधिकारी, जि.प.सदस्य, प.स सभापती, सदस्य, नगरसेवक, सर्व आघाड्या, मोर्चे यांचे अध्यक्ष व पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, व सर्व तालुकाभरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.