उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश

0

मुंबई:  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले.

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेनं उर्मिला यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर उर्मिला यांच्याशिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच या चर्चेला दुजोरा दिला होता. त्यानुसार आज दुपारी उर्मिला मुख्यमंंत्र्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पोहोचल्या. तिथं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधलं. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांच्या तसबिरीला नमस्कार केला.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करत उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. पण लोकसभा निवडणुकीत उर्मिला यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादावर तोंडसुख घेत उर्मिला यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाला रामराम ठोकला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.