जळगाव : सोने चांदीचा आजचा हा आहे भाव ; जाणून घ्या दर

0

जळगाव,- देशातील कोरोना व्हायरस व्हॅक्सिन संदर्भात सकारात्मक वृत्त समोर आल्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे सोन्याच्या किंमतीतही  घसरण होत आहे. कोरोना लशीच्या बातम्यांमुळे सुरक्षित गुंतवणूक असणाऱ्या संपत्तीवर परिणाम होत आहे.३० सोमवार रोजी  सोमवारी सोन्याचे दर गेल्या ५ महिन्यातील नीचांकी स्तरावर पोहोचले आहेत. गुंतवणूकदार सोन्यातील पैसे काढून शेअर बाजारात गुंतवत आहेत.

जगभरातील मार्केटमध्ये कोरोना व्हॅक्सिन संदर्भातील बातम्यांमुळे आशावाद पाहायला मिळत आहे. शेअर बाजारात देखील तेजी पाहायला मिळते आहे.सुवर्णनगरी म्हणून देशात प्रसिद्ध असलेल्या जळगावात मागील गेल्या तीन दिवसापासून सोन्याच्या दर जैसे थे आहे. आजचा सोन्याचा दर ४८ हजार ८०० रुपये प्रतितोळावर (१० ग्रॅम) पोचले आहेत. मार्चच्या मध्यात सोन्याचे दर कमाल ४१ हजार रुपये प्रतितोळापर्यंत होते. तर चांदीच्या भाव देखील जैसे थे असून आजचा चांदीचा भाव ६४,७०० आहे.

सोमवारी स्पॉट गोल्ड ०.८ टक्क्यांनी कमी होऊन १,७७४.०१ डॉलर प्रति औंस झाले आहे, यामुळे सोन्याची या महिन्यातील घसरण  ५. ६ टक्क्यांवर पोहोचली आहे. यामुळे सोन्याच्या किंमती २  जुलैच्या नीचांकी स्तराच्याही खाली गेल्या आहेत. या दिवशी दर १,७६४.२९ डॉलर प्रति डॉलर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.