उर्मिला मातोंडकरांना शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेचं तिकीट?

0

मुंबई । प्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवर नियुक्ती होण्याची जोरदार चर्चा आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकीटावर मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची चिन्हं आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी बातचीत केल्याचं कळतं. उर्मिला मातोंडकर यांचं उत्तर अद्याप समोर आलेलं नाही. मात्र मराठी चेहरा आणि मराठी नाव, तसंच राज्यपालनियुक्त जागेसाठी योग्य व्यक्ती म्हणून उर्मिला मातोंडकर यांना आपल्या कोट्यातून उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचं कळतं.

त्यानंतरही काँग्रेसने त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी देऊ केली होती. पण मला विधानपरिषदेच्या जागेसाठी रस नाही, असं उत्तर उर्मिला मातोंडकर यांच्याकडून मिळाल्याचं समजतं. तरीही त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार असाव्यात यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.