जळगाव पालिकेचे उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणेंचा राजीनामा

0

जळगाव : महानगरपालिकेचे उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी गुरुवारी सायंकाळी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला पदाचा राजीनामा महापौर भारती सोनवणे यांच्याकडे सोपवला आहे. महापौरांनी तातडीने मंजूर करून नगरसचिव कार्यालयाकडे पाठवला. त्यामुळे सोमवारी नवीन उपमहापौर निवडीसाठी विभागीय कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. डॉ. सोनवणेंच्या राजीनाम्यानंतर आता उपमहापौरपदासाठी भाजपचे जुने कार्यकर्ते सुनील खडके यांचे नाव आघाडीवर आहे.

 

भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी बुधवारी रात्री फोन करून डॉ. सोनवणेंना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश केले होते. त्यानुसार डॉ. साेनवणे यांनी गुरुवारी सायंकाळी ६ वाजता महापाैर सोनवणेंची भेट घेत त्यांच्याकडे दीड ओळीचा राजीनामा सादर केला. दरम्यान,  उपमहापौरपदासाठी भाजपचे गेल्या २२ वर्षांपासून कार्यकर्ते असलेले सुनील वामनराव खडके यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.  नवीन उपमहापौरांना या अडीच वर्षाच्या टर्ममध्ये केवळ चार महिने संधी मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.