दगडी दरवाज्यावर मांगीर बाबांची मुर्ती बसवावी

0

अमळनेर(प्रतिनिधी)-शहरातील  दगडी दरवाज्यावर मांगीर बाबांची मूर्ती बसवावी व मातंग समाजासाठी सामाजिक सभागृह बांधनेकामी न.प.कडून जागा मिळावी या मागणीचे निवेदन बहुजन रयत परिषद व समस्त मातंग समाजाकडून नगराध्यक्षा पुष्पलता ताई पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांना  देण्यात आले.

दगडी दरवाज्याचे देखभाल व दुरुस्तीचे काम हे पुरातत्व विभागाने न.प.कडे हस्तांतरण केले आहे.त्या अनुषंगाने सदर दगडी दरवाज्याचे देखभाल व दुरूस्तीच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. रहदारीस  अडथळा निर्माण करणाऱ्या दरवाज्याच्या पुढच्या बुरुजाचे भाग पाडून प्रत्यक्षात कामास सुरुवातही करण्यात आली आहे.

दरवाज्याच्या पुढच्या एका बुरुजामध्ये प्राचीन काळापासून मातंग समाजाचे आराध्य दैवत मानले जाणाऱ्या  मांगीर बाबांची मूर्ती त्या ठिकाणी स्थित होती. परंतु सदर दगडी दरवाज्याचा हा भाग पाडून टाकल्यामुळे परिणामी मांगीर बाबांची मूर्तीही उध्वस्त झाली आहे. तरी सदर दगडी दरवाज्याचे नवीन निर्माण करतेवेळी त्याठिकाणी मांगीर बाबांची मूर्ती पूर्ण धार्मिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करून बसविण्यात यावी या मागणीसह मातंग समाजासाठी  सामाजिक सभागृह बांधनेकामी आपल्या नगरपरिषदे मार्फत जागा मिळावी  अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे,तालुकाध्यक्ष संजय मरसाळे, भीम लहुजी सेनेचे राज्य संघटक सुरेश कांबळे,सल्लागार हरिश्चंद्र कढरे सर,रमेश वाघ,जितेंद्र कढरे,प्रविण वाघ आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.