उपमुख्‍यमंत्री अजित पवार उद्या जळगाव दौऱ्यावर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आणि एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तसेच उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी अजित पवार हे जिल्‍ह्यात विविध कामांचा शुभारंभनिमित्‍त तसेच कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतील

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जळगाव दौरा नेहमी मार्गदर्शक ठरला आहे, ते जळगाव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री आहेत, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून ते प्रथमच जळगाव जिल्हा दौरा करीत आहेत. शुक्रवारी (ता. १७) ते जळगाव जिल्ह्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष अँड. रवींद्र पाटील यांनी याबाबत ही माहिती दिली.

अॅड. रवींद्र पाटील म्हणाले की, सकाळी ८ वाजता अजित पवार विमानाने जळगाव विमान तळावर येणार आहेत. तेथून अजिंठा विश्रामगृहावर ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील, सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांशी बैठक घेतील, त्यानतंर जिल्हा दूध विकास संघाच्या नवीन दूध प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. त्यानतंर ते भुसावळ येथे रवाना होतील त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केवळ एक आमदार निवडून आला आहे, भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्हा बँक पक्षाच्या ताब्यात आली आहे,त्यात शिवसेना,काँग्रेस भागीदार आहे.अशा स्थितीत अजितदादा कार्यकर्त्यांना काय संदेश देणार या कडे लक्ष आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.