उपचारकर्त्या डाॅक्टरांना क्वारंटाइन करा

0

यावल | कोरोना रुग्णांवर शहरी व ग्रामीण भागात ज्या डॉक्टरांनी उपचार केले असतील तर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात यावे, अशी मागणी शहरातील मेडिकल असोसिएशनतर्फे येथील तहसील कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात अाली अाहे. नुकतेच तालुक्यातील कोरपावली येथे रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संपूर्ण कुटुंबास केअर सेंटरला हलवण्यात आल्याने हे निवेदन देण्यात आले आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग तालुक्यात वाढत असून ग्रामीण भागातही रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील मेडिकल असोसिएशनतर्फे येथील तहसील कार्यालयात तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या कडे संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शहरी व ग्रामीण भागात सर्वच डॉक्टर वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्याकडून स्वत:ची व रुग्णांची काळजी घेत सेवा बजावली जात आहे. मात्र यामध्ये जर कुणी रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला व तो एखाद्या डॉक्टरांच्या संपर्कात अाला असेल तर त्या संबंधित डॉक्टर व त्यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून थेट कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन केले जावू नये. जर संबंधितापासून धोका वाटत असल्यास त्या -त्या डाॅक्टरांना घरीच होम क्वारंटाइन करावे. जेणेकरून ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवा देण्यास सर्वच तयार राहतील. अन्यथा कोविड सेंटरला संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन होण्याच्या भीतीने कुणीच शहरी व ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यास पुढे येणार नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात अाले आहे. या वेळी संघटनेचे डॉ.मनोज वारके, डॉ.तुषार फेगडे, डॉ.अमित तडवी, डॉ.धीरज पाटील अादी उपस्थित हाेते.
भागातील आरोग्य सेवा देण्यास सर्वच तयार राहतील. अन्यथा कोविड सेंटरला संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन होण्याच्या भीतीने कुणीच शहरी व ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्यास पुढे येणार नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात अाले आहे. या वेळी संघटनेचे डॉ.मनोज वारके, डॉ.तुषार फेगडे, डॉ.अमित तडवी, डॉ.धीरज पाटील अादी उपस्थित हाेते.

Leave A Reply

Your email address will not be published.