चिंताजनक ! एकाच दिवसात राज्यात कोरोनामुळे चार पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

0

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर काही केल्या कामी होत नाहीय. एकाच दिवसात राज्यात कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे चार पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये एक पुणे येथील तर दोन मुंबईतील आहेत.

दरम्यान, पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना संबंधित वाहतूक पोलिसाची प्राणज्योत मालवली. आतापर्यंत पुण्यात दोघा पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 15 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात एकट्या मुंबईत आतापर्यंत 11 पोलिस कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे प्राण गमावला आहे. पुण्यात दोन तर नाशिक आणि सोलापूरमध्ये प्रत्येक एक पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.