पारोळ्यात पाच दिवसाचा जनता कर्फ्यू ; पहिल्या दिवशी सर्वत्र बंद !

0

पारोळा (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारोळ्यात पाच दिवसाचा जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. यात २१ रोजी आज पहील्या दिवशी पारोळा शहरात कडकडीत शंभर टक्के बंद पाळण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसुन आला तर रस्ते ओस पडलेले दिसुन आले.

याबाबत माहिती अशी की, अमळनेर, भडगांव, धरणगांव, एरंडोल , अश्या चहुबाजूने पारोळा तालुक्याला कोरोना कोव्हीड १९चा संसर्गाने वेढल्याचे दिसुन येत आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्हचे रुग्ण ही सर्व प्रमुख शहरा मध्ये आढळून येत असल्याने त्या त्या ठिकाणी जनता कर्फ्यू पाळून बंद असल्याने पारोळा बाजारपेठेत गर्दी वाढल्याचे दिसुन आल्याने या वाढलेल्या गर्दी ची दखंल प्रशासनाने गंभीर्याने घेतली असून आजुबाजुचे तालुके सोडले तर फक्त पारोळा तालुका तेवढा कोरोना मुक्त आहे. या तालुक्यात कोरोना चा शिरकाव होऊ नये म्हणून प्रशासनासह लोकप्रतिनिधी ही प्रयत्नशील असून त्या अनुषंगाने पारोळा शहरातील प्रमुख बाजारपेठ ही सलग पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय सर्व संमती ने घेण्यात आला.

यातसर्व प्रथम पारोळा तहसीलदार अनिल गवांदे , नगराध्यक्ष करण पाटील, मुख्याधिकारी डॉ, विजयकुमार मुंडे, पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे, डॉ अजंली पाटील, कुटीर रूग्णालयचे वैद्यकिय अधिकारी योगेश सांळुखे, डॉ शिरीष जोशी , डॉ महाजन ,तसेच पत्रकार यांची संयुक्त बैठक होऊन बंदच्या विषयांवर चर्चा करून पारोळा शहरात पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्याच्या विषयावर चर्चा झाली तद्नंतर नगराध्यक्ष करण पवार यांनी पारोळा शहरातील सर्व व्यापाऱ्याशी विचार _ विनिमय करून कोणालाही या बाबत काही अडी- अडचणी असल्यास सांगण्याचे आव्हान केले तेव्हा सर्व व्यवसायीक व व्यापाऱ्यांनी एक मताने या विषयावर निर्णय घेऊन पाच दिवस संपूर्ण शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्धार केला व या जनता कर्फ्यू मध्ये भाजीपाला व्यावसायिकांनी स्वताहुन पाच दिवस बंद ठेवण्याचे सांगितले. दि २१ रोजी शहरात पहिल्या दिवशी सकाळ पासून जिकडे तिकडे शुकशुकाट दिसून येत होता तर अधुन- मधून प्रशासनाच्या गाड्या शहरात गस्त घालताना दिसुन येत होत्या. तर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता.

शहर शंभर टक्के बंद यशस्वी ; करण पाटील

पारोळा शहरातील सर्व व्यावसायिक व व्यापारी यांनी दिलेल्या शब्दा नुसार आज पारोळा शहरात स्वता: नगरसेवकांसह बाजारपेठेतून व शहरातील प्रमुख मार्गावरून फेरफटका मारून पाहिले असता संपूर्ण शहर शंभर टक्के बंद दिसून आले. तसेच शहरात शुकशुकाट दिसून आले, या बद्दल सर्व व्यापारी व व्यवसायीक यांचे आभार तसेच पुढील चार दिवस ही अशीच आपली साथ मिळेल अशी अपेक्षा.

– करण पाटील
नगराध्यक्ष, पारोळा

Leave A Reply

Your email address will not be published.