१५७ दिव्यांगांना चार लाख ७१ हजारांचा लाभ

0

बोदवड | प्रतिनिधी

शासनाच्या वतीने नगरपंचायतीचा दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी वितरित करता येतो. या निधीचा लाभ लवकरात लवकर मिळावा यासाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने पाठपुरावा केला हाेता. त्यास अखेर यश मिळाले.
येथील नगरपंचायतीतर्फे सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीचे वाटप दिनांक मंगळवारी करण्यात आले. शहरात एकूण १५७ दिव्यांग बांधव असल्याची नोंद नगरपंचायत कार्यालयात आहे. त्या सर्व लाभार्थींना प्रत्येकी तीन हजार रुपये या प्रमाणे आरटीजीएसद्वारे ४ लाख ७१ हजारांचा निधी लाभार्थींच्या खात्यामध्ये थेट वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे या लॉक डाऊनच्या काळात दिव्यांगांना या निधीची मदत होणार आहे.
निधी मिळावा यासाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाकडून एक वेळा निवेदन व स्मरण पत्र देण्यात आले होते. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाल्याने राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने व दिव्यांग बांधवांनी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.