उन्हाळ्यात मनपाची डेरेदार वृक्षावर कुर्‍हाड!

0

जळगाव –
मनपा प्रशासनाकडून ख्वॉजामिया चौकातील विकास कामात अडथळा ठरणार्‍या वृक्षावर मंगळवारी दुपारी कुर्‍हाड चालवून तोडण्यात येवून परिसर बोडका करण्यात आला. सदर कारवाईदरम्यान ख्वॉजामिया दरगाह ते गणेश कॉलनी हा रस्ता बंद करण्यात आल्याने गणेश कॉलनीचा संपर्क काही काळ तुटला होता.
मनपा प्रशासनातर्फे गणेश कॉलनी परिसरात रस्त्याच्या मधोमध विद्युत पोल उभारणीचे काम चालू आहे. या कामादरम्यान दरगाहच्या मागील बाजूस असलेला भला मोठा डेरेदार वृक्ष मेन लाईनला अडथळा ठरत होता. तर नवीन पोललाही फांद्या अडत होत्या तसेच पुढे सदर रस्त्याचे रुंदीकरण होणार असल्याने मनपाच्या अग्निशमन दलाचा ट्रक बोलावून त्यावर चढून वृक्षाच्या फांद्या छाटण्यात आल्या. नंतर संपुर्ण वृक्ष भुईसपाट करण्यात आला.
गणेश कॉलनीसाठी पर्यायी मार्गाचा वापर
वृक्ष तोडण्याच्या कारवाईदरम्यान गणेश कॉलनी रस्ता दरगाह पासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांनी जुन्या महावीर क्लासेसच्या गल्लीतून पर्यायी मार्गाचा उपयोग केला. हा रस्ताही कच्चा असल्याने वाहनधारकांना अडचण होत होती. तर या रस्त्यावरही वाहनधारकांनी गर्दी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.