आरपीडी रोडवरील नागरिक व मुस्लिम बांधव रस्त्यावर

0

पाच फूट रस्ता सोडण्याचे रेल्वे प्रशासनाचे आश्वासन

भुसावळ –
येथील आरपीडी रोडवर असलेले धार्मिक स्थळ व मंदिरे तसेच मुस्लिम बांधवांचे प्रार्थनास्थळ पंजाबी मशीद आहे,मागील महिन्यात रेल्वे प्रशासनातर्फे या रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात आली , दरम्यान या रस्त्यावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने दुतर्फ़ा लोखंडी जाळ्या खांब बसविण्यात येत आहे . या जाळ्या व खांब बसविण्याकरिता मंगळवारी दि . 26 रोजी दुपारी 4 च्या सुमारास कर्मचारी काम करीत असतांना पंजाबी मशिदीमध्ये जाण्यास रस्ता न ठेवल्याने नाराज होऊन पररिसरातील सर्व मुस्लिम बांधवांसह नागरिक रस्त्यावर आले व त्यांनी बंद करण्यास विरोध दर्शविला . सर्वानी एकच मागणी केली की आम्हाला दर्शनाकरिता व नमाज पठाणाकरिता ये जा करण्यासाठी जागा सोडावी. मात्र रेल्वे कर्मचारी तयार होत नव्हते यामुळे याठिकाणी संबंधित विषय चिघळून काहीकाळ वातावरणात तणाव निर्माण झाला . मात्र त्वरित घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी व नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली . आरपीएफ अधिकारी यांनी मध्यस्थी करून रेल्वे अधीकारी यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क करून सर्व माहिती दिली व जमावाचा गैरसमज दूर केला पाच फूट रस्ता सोडण्याचे सांगून व परिस्थिती नियंत्रणात आणली .

Leave A Reply

Your email address will not be published.