ईंधवे येथे सासरा व सुनेवर दगडफेक ; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

पारोळा (प्रतिनिधी)

तालुक्यातील ईंधवे येथे सासरा व सुनेवर दगडफेक करून शिवीगाळ केल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध पारोळा पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत दिनांक 15 रोजी दुपारी दोन वाजता प स  सदस्या छायाबाई जितेंद्र पाटील व त्यांचे सासरे आनंदा संतोष पाटील हे त्यांच्या घराच्या ओट्यावर उभे असताना दीपक अधिकराव पाटील, योगेश माधवराव पाटील, माधवराव गणपत पाटील, शरद विश्वास पाटील, बाबा उर्फ विनोद विश्वास पाटील, धनराज फकीरा पाटील, कन्हैयालाल गेंदल पाटील, धनराज गेंदल पाटील, रजुभाई विश्वास पाटील, यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून वरील सासरे व सुनेवर दगडफेक करून दुखापत व शिवीगाळ करीत दीपक पाटील याने तुझे कुंकु पुसावे लागेल या आधी कमी झाले आहे का? अशी धमकी दिली याबाबत छायाबाई पाटील यांनी पारोळा पोस्टेला वरील नऊ जणांविरुद्ध  कलम143,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल इक्बाल शेख हे करीत आहेत या प्रकरणात सामनेवाल्या पार्टीनेही पारोळा पोस्टला अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.