इंधन दरवाढ सुरूच ; पाहा आजचा दर

0

मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीपासून सुरु झालेली इंधन दरवाढ आज शुक्रवारी देखील कायम आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली. पेट्रोल २० पैसे तर डिझेल २३ पैशांनी महागले.

आजच्या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव ८९.५२ रुपये झाला आहे. डिझेलचा एक लीटरचा भाव ७९.६६ रुपये आहे. दिल्लीत एक लीटर पेट्रोलसाठी ८२.८६ रुपये असून डिझेलचा भाव ७३.०७ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८५.७६ रुपये असून डिझेल ७८.४५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोलचा भाव ८४.३७ रुपये असून डिझेल ७८.४५ रुपये आहे.

मागील १२ वेळा झालेल्या दरवाढीत पेट्रोल १.८० रुपयांनी महागले आहे.डिझेलमध्ये मागील १२ वेळा झालेल्या दरवाढीने २.६१ रुपयांची वाढ झाली आहे. त्याआधी ४८ दिवस इंधन दर स्थिर होते. त्यापूर्वी ऑगस्टमध्ये झालेल्या दर कपातीने डिझेल २.६१ रुपयांनी स्वस्त झाले होते.

 

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सध्या ४८ डॉलर प्रती बॅरल आहेत. त्यामुळे तेल आयातीचा खर्च वाढला आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी मागील दोन आठवड्यांपासून पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीची मात्रा सुरु ठेवली आहे. याआधी गुरुवारी पेट्रोल १७ पैसे आणि डिझेलमध्ये १९ पैशांची वाढ करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.