तीन दिवसांत सोने १५०० तर चांदी ५ हजार रुपयांनी महागली ! जाणून घ्या दर

0

जळगाव : फायजर कंपनीच्या लसीकरणासाठी यूकेची मान्यता मिळाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेला मंदीचा कल झुगारून देशांतर्गत सराफा बाजारात गुरुवारी सोन्या-चांदीच्या किमती वधारल्याचे दिसून आले. तीन दिवसांत सोने १५०० रुपये तोळा तर चांदी ५ हजार रुपये प्रति किलोने वाढली.

सोन्याचे भाव चार महिन्यांनी (२४ नोव्हेंबर) पुन्हा ५० हजारांच्या खाली आले होते. तेच भाव ३० नोव्हेंबरला आणखी खाली घसरून ४८७०० व ६०,००० रुपयांवर स्थिरावले. दरम्यान फायजर कंपनीच्या लसीकरणासाठी यूकेची मान्यता मिळाल्याचे वृत्त आल्याने गुरुवारी भारतीय सराफा बाजारात याचे सकारात्मक पडसाद उमटले. जळगावच्या सराफा बाजारात सायंकाळी उशिरापर्यंत सोने ५०२०० रुपये तोळा तर चांदीचे ६५००० रुपये किलोने व्यवहार झाले.

वायदा बाजारातील चढ-उतार

सोने दर (१० ग्रॅम) : ४९,८७४ वर उघडले, ४९९३६ पर्यंत सर्वाधिक तर ४९१८९ पर्यंत खाली आले.

चांदी दर (१ किलो) : ६२६०० वर उघडले, ६३००० पर्यंत सर्वाधिक तर ६२२३६ पर्यंत खाली आले.

Leave A Reply

Your email address will not be published.