इंधन दरवाढीचा धडाका ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डीझेलचा दर

0

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा सपाटा सुरु केला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने पेट्रोल आणि डिझेल दरात भडका उडाला आहे. आज बुधवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

आज देशभरात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी २५ पैशांनी महागले आहे. त्याआधी गेल्या आठवड्यात पेट्रोलियम कंपन्यांनी सलग चार दिवस इंधन दरवाढ केली होती. त्यानंतर दोन दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९८.३६ रुपये झाला आहे. तर दिल्लीत पेट्रोल ९२.०५ रुपये झाले आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९८.८४ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९२.१६ रुपये झाला आहे.

आज मुंबईत एक लीटर डिझेलचा भाव ८९.७५ रुपये झाला आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८२.६१ रुपये झाला आहे. चेन्नईत डिझेल ८७.४९ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८५.४५ रुपये प्रती लीटर झाले आहे. गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या दरवाढीने राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे.

 सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.