जळगाव जिल्ह्यात आज ८४३ नव्या रुग्णांची नोंद

0

जळगाव । मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोणाचा संसर्ग काहीसाअंशी कमी होतानाचे दिसून येत आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ८४३ नवे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे.  ७४० कोरोनामुक्त झाले आहे.  तर जिल्ह्यात महिनाभरानंतर दुसऱ्यांदा दिवसभरातील मृत्युची संख्या १५ च्या आत नोंदली गेली. गेल्या २४ तासांत १४ रुग्णांचा बळी गेला.

आजच्या रुग्ण वाढीनंतर  जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ लाख ३१ हजार ५७४ इतकी झाली आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख १९ हजार ३०८ इतका झाला आहे.आज १४ जणांचा मृत्यू झाला असून मृताचा एकूण आकडा २ हजार ३६३ वर गेला आहे. सध्या जिल्ह्यात ९९०३ रुग्णांवर उपचार सुरु आहे.

जळगावात नवे रुग्ण शंभराच्या आत

जळगाव शहरात दुसऱ्या दिवशी नवे रुग्ण शंभराच्या आत आढळून आले. आज शहरात केवळ ६९ रुग्ण आढळून आले असून ९९ रुग्ण बरे झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन १४६८ वर आली आहे.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर- ६९, जळगाव ग्रामीण- २५, भुसावळ- ८९, अमळनेर- ९४, चोपडा- १०७, पाचोरा- ७९, भडगाव- ०३, धरणगाव-२६, यावल- २०, एरंडोल- २८, जामनेर- ६४, रावेर- ५१, पारोळा-१४, चाळीसगाव- ६२, मुक्ताईनगर-६३, बोदवड- ४२, अन्य जिल्ह्यातील- ०७ असे एकूण ८४३ रुग्ण आढळून आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.