आदिवासी वस्तीवर संविधान दिनाचा जागर

0

एरंडोल –  येथून जवळच असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत गालापुर अंतर्गत  आदिवासी वस्तीवर संविधानाचा जागर कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य महासचिव तथा मराठा सेवा संघ प्रणित शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष किशोर पाटील कुंझरकर यांनी त्यांच्या लेखाचे वाचन करून आणि घरोघरी संविधानाचे व पालकांना पटवून देत  केला. महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने देखील आज राज्यभर कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. संविधाना देशाचा आत्मा असून देशाला महासत्ता बनवण्यासाठी व पुढे नेण्यासाठी सर्वांनी सर्वांना समजून घेणे तसेच समता स्वातंत्र्य न्याय बंधुता याचे महत्व सांगितले. याप्रसंगी तेजस प्रकल्प एरंडोल तालुक्याच्या टॅग कॉर्डिनेटर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गा लापुरच्याआदर्श शिक्षिका जयश्री पाटील यांनी बोलताना संविधानामुळे महिलांना मिळालेले हक्क व अधिकार आणि जीवनातील न्याय स्वातंत्र्य समता मूल्यांचे महत्व याविषयी प्रबोधन केले. आदिवासी वस्तीवरील सुरेश भिल, सुनील भिल ,सुभाष भिल , रेखा भील,आदींनी परिश्रम घेतले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्लवस्ती गालापूर या ठिकाणी प्रास्ताविकेचे उद्देशिकेचे वाचन करण्यात आहे. कोरोणा पार्श्वभूमीवर  नियम पाळून विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून शिवनेर भील उपस्थित होते. घरोघरी जाऊन पालकांना संविधान दिनाचे महत्त्व शाळेचे मुख्याध्यापक तथा राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी पटवून दिले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.