.. असे कोसळले बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर (व्हिडीओ)

0

नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क  

तामिळनाडूच्या कुन्नूर इथं झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे चीफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्यासह १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात तेव्हा झाला ज्यावेळी हेलिकॉप्टर लँड करणार होते. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओत हेलिकॉप्टर धुक्यातून बाहेर पडले आणि आकाशात दिसले. घटनास्थळी हवामान खराब असल्याचे काही सेकंदांच्या व्हिडिओवरून स्पष्ट होते.

या व्हिडिओमध्ये काही स्थानिक लोक दिसत आहेत. त्यांनीही हेलिकॉप्टरचा आवाज ऐकल्यावर त्याकडे पाहिले. विशेष म्हणजे डोंगरामधील हवामान कधीही बदलू शकते. तथापि, जेव्हा जेव्हा हेलिकॉप्टर उड्डाणासाठी तयार होते तेव्हा ते सर्व पॅरामीटर्सवर तपासले जातात.

सूत्रांच्या माहितीनुसार, सकाळी ८.४७ मिनिटांनी पालम एअरबेसवरुन भारतीय वायूदलाचं विमान रवाना झालं होतं. सकाळी ११.३४ वाजता ते सुलुर एअरबेसला पोहचलं. सुलुरमधून सीडीएस रावत यांनी एमआय१७ व्ही ५ हेलिकॉप्टरमधून ११.४८ वाजता वेलिंगटन येथे उड्डाण घेतलं. त्यानंतर दुपारी १२.२२ मिनिटांनी हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.

कुठल्याही प्लेन अथवा हेलिकॉप्टरमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग ब्लॅक बॉक्स असतो. हे विमान आणि हेलिकॉप्टरच्या उड्डाणावेळच्या सर्व हालचाली रेकॉर्ड करत असतं. पायलट आणि ATC यांच्यातील संवादही रेकॉर्ड होतो. पायलट आणि को पायलट यांच्यातील संवाद रेकॉर्ड होतो. कुन्नूर येथील दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स सापडला असून त्यामुळे अपघाताचं खरं कारण आता समोर येण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.