अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

0

भडगाव | प्रतिनिधी

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाने जमा केले होते ते ट्रॅक्टर शासकीय विश्रागृह येथे येथून अज्ञाताने चोरून नेल्याने एका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात असून ते ट्रॅक्टर भडगाव पोलिस स्टेशन ला जमा करण्यात आले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, दि.७ रोजी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर हे महसूल विभागाने जमा  करूनशासकीय विश्रागृहात  लावले असता अज्ञाताने विश्राम गृह येथून दीड लाख रुपये किंमतीचे व त्यामधील तीन हजार रुपये किंमतीची वाळू लाबडीच्या इराद्याने चोरून नेले होते म्हणून फिर्यादी – विलास पांडुरंग शिंदे तलाठी- वडजी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरूद्ध भाग ५ गु.र.ण.१०८/२०२० भा.द.वी. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टर जमा करण्यात आले आहे. पुढील तपास पो. हे. कॉ. प्रल्हाद शिंदे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.