भडगावात सोळा मोटारसायकल स्वारां विरूद्ध गुन्हा दाखल

0

भडगाव | प्रतिनिधी 

संपूर्ण जगात कोरोणाचा कहर वाढत आहे. या बाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस संपूर्ण देश लॉक डाऊन केले असून कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन नागरिकांना केले आहे. या बाबत माहिती असून सुद्धा नागरिक मोटारसायकल घेऊन बिनकामाचे फिरत आहे. म्हणून आज भडगाव पोलिस गस्तीवर असताना सोळा मोटारसायकल स्वारां विरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करून मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

या बाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण देशात संचारबंदी लागू आहे. कुणीही घराबाहेर जाऊ नये अथवा मोटरसायकल फिरू नये असे आदेश असताना दुपारी साडेबारा वाजता शहरात पाचोरा चौफुली, पारोळा चौफुली येथे सोळा मोटारसायकली फिरवीत होते. यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पोलिसांच्या फिर्यादीवरून कलम १८८ प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तिन्ही मोटरसायकल पोलिस स्टेशनला जमा करण्यात आल्या आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.