अवंता फाउंडेशन संस्थेचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा

0

चहार्डी ता.चोपडा – येथील अवंता फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा तृतीय वर्धापनदिन सोहळा ग्रामसचिवालयात नुकताच उत्साहात पार पडला.यावेळी उल्लेखनीय कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांना समाजरत्न पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. प्रमिला प्रकाश पाटील होत्या. अवंता फाउंडेशनचे सुरू असलेले प्रकल्प 1) प्रेरणा शालेय किशोरवयीन विद्यार्थी  लैंगिक समुपदेशन 2) प्राथमिक शालेय गरीब गरजू  विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना 3) प्रेरणा कौशल्य विकास प्रकल्प कार्यान्वित असून, संस्थेचे चोपडा तालुक्यात समाजाभिमुख कार्य सुरू आहे.कार्यक्रमाची  सुरवात संविधान पूजन करून करण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ नारायण पाटील (जेष्ठ शिक्षक व समाज कार्यकर्ते चहार्डी ) सौ. आशा ताई गजरे (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त), डॉ.मोहिनी उपासनी (प्राध्यापक समाजकार्य महाविद्यालय चोपडा),माधुरी कंखरे (पीएसआय चहार्डी) यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुदर्शन पवार यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मनोहर ढिवरे यांनी केले.संजय करंदीकर यांनी कार्यक्रमाची रुपरेषा मांडली.कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मनोहर ढिवरे, सचिव प्रियंका ढिवरे,उपाध्यक्ष पंकज ढिवरे, प्रेरणा शालेय किशोरवयीन विध्यार्थी लैंगिक समुपदेशन प्रकल्पाचे व्यस्थापक संजय करंदीकर, समन्वयक स्वप्नाली करंदीकर, समुपदेशक रोहन ढिवरे,विजय कोळी, श्रीपाद पुराणिक माधुरी ढिवरे यांनी अथक परिश्रम घेतले.

यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य  केलेल्या सौ.आशाताई गजरे (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त),डॉ.मोहिनी उपासनी,प्रा.संबोधी देशपांडे ( प्राध्यापक समाजकार्य महाविद्यालय चोपडा) माधुरी कंखरे (पीएसआय चहार्डी),चहार्डीच्या सरपंच प्रमिलाताई प्रकाश पाटील,कोकिळा रामटेके (मुंबई) आधार करंदीकर ( सामाजिक कार्यकर्ते चहार्डी),गोकुळ करंदीकर (सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक मुंबई), डॉ.भावना भोसले  ( गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चोपडा)  प्रा.मारोती गायकवाड ( प्राध्यापक समाजकार्य महाविद्यालयात चोपडा) विजय मोरे (समूह संघटक पंचायत समिती चोपडा) सुदर्शन पवार (ग्रामपरिवर्तक मुख्यमंत्री फेलोशिप वर्धा) अशोक पाटील (मुख्यध्यापक  किनगाव) संजय धनगर ( सामाजिक कार्यकर्ते चहार्डी), डॉ. आशुतोष येजरे (शहर क्षयरोग अधिकारी वसई विरार महानगरपालिका) ,अस्तित्व प्रतिष्ठान ( नालासोपारा मुंबई), प्रशांत सोनवणे ( सामाजिक कार्यकर्ते चहार्डी),संजय कांबळे  (वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक वसई विरार महानगरपालिका), रवींद्र महाजन ( समाजकार्य महाविद्यालयात चोपडा), गोविंद शर्मा ( सामाजिक कार्यकर्ते मुंबई), मल्हारी पोकगरकर ( सामाजिक कार्यकर्ते मुंबई), गौरव महाले (सामाजिक कार्यकर्ते) यासर्व सामाजिक कार्यकर्त्यांचा समाजरत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रेरणा किशोरवयीन शालेय समुपदेशन प्रकल्पास कार्यरत असलेले समुपदेशक रोहन ढिवरे, विजय कोळी,माधुरी ढिवरे,श्रीपाद पुराणिक  आदींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.