जळगाव पीपल्स बँकेच्या दिनदर्शिका 2020 चा प्रकाशन व वितरण संपन्न

0

जळगाव  – दि जळगाव पीपल्स को-ऑप बँक आपल्या सभासदांसाठी विविध कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत दरवर्षी दिनदर्शिका छापून वितरण करीत असते. यावर्षी बँकेने बँकेच्या सेवासुविधांविषयी माहिती देणारी दिनदर्शिका उपलब्ध करुन दिली आहे. सदर दिनदर्शिका वाटप शुभारंभ आज दिनांक 19.12.2019 रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आला.

शुभारंभाचे माननीय अतिथी सर्व मान्यवर अ‍ॅड.यशवंतराव महाजन, अ‍ॅड.शरद पाटील, अ‍ॅड.रोहन बाहेती (सेक्रेटरी, क्रिडा रसिक एज्युकेशन सोसायटी), श्री.छबीलदास खडके, श्री.भास्करराव कोल्हे, श्री.राधेशाम लाहोटी, श्री.रमेश भोळे, श्री.यशवंतराव नेमाडे या मान्यवरांच्या शुभहस्ते बँकेच्या दिनदर्शिकेचा वितरण शुभारंभ करण्यात आला. तसेच सर्व माननीय अतिथींचा शॉल, श्रीफळ व भेटवस्तू देवून बँकेतर्फे सत्कार करण्यात आला. बँकेचे संचालक माननीय सभासद, ग्राहक व शुभचिंतक यांनी सदैव दिलेल्या पाठींब्याबद्दल आभार मानले. बँक यासारख्या विविध सभासद कल्याणकारी योजना राबवित असते. सभासदांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. उपस्थित मान्यवर अतिथींनी बँकेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

बँकेचे चेअरमन श्री.भालचंद्र पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, बँकेने अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून पुन्हा प्रगतीकडे वाटचाल सुरु केली आहे. बँकेस प्रत्येक परिस्थितीमध्ये पाठींबा देणारे व बँकेच्या संचालक मंडळ व व्यवस्थापनावर विश्वास ठेवणारे उपस्थित  मान्यवरांसारखे सभासद, ठेवीदार, कर्जदार व ग्राहक मिळत आले आहेत म्हणून बँक अडचणींवर मात करुन उत्तम प्रगती करीत राहणार आहे. मान्यवर अतिथींपैकी श्री.राधेशाम लाहोटी, अ‍ॅड.यशवंतराव महाजन, अ‍ॅड.शरद पाटील आणि श्री.रमेश भोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात बँकेच्या सचोटीवर व बँकेच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. बँकेची सदैव भरभराट होईल याचा आम्हाला सार्थ विश्वास आहे व अशा बँकेशी जुळल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे सांगितले.

कार्यक्रमास मान्यवर अतिथींसोबत बँकेचे संचालक प्रा.विलास बोरोले, श्री.चंदन अत्तरदे, प्रबंध संचालक व सीइओ श्री.दिलीप देशमुख इ. मान्यवर उपस्थित होते. बँकेचे अधिकारी श्री.अतुल जोशी यांनी सूत्रसंचालन केले. दिनदर्शिका वाटप दि.20 डिसेंबर 2019 ते दि.31 डिसेंबर 2019 पर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या वेळेत (सुटीचे दिवस वगळून) उपलब्ध आहे. आपणास विनंती की, आपण आपली दिनदर्शिका 31 डिसेंबर 2019 च्या आत घेवून जावी.

Leave A Reply

Your email address will not be published.